Friday, May 15

Tag: District Annual Plan 2026-27

District Annual Plan : जिल्हा वार्षिक योजना 2026-27 : 506.38 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी, 294 कोटींची अतिरिक्त मागणी

District Annual Plan : जिल्हा वार्षिक योजना 2026-27 : 506.38 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी, 294 कोटींची अतिरिक्त मागणी

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2026-27 अंतर्गत 506 कोटी 38 लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास राज्य शासनाची मान्यता मिळाली असून, विविध क्षेत्रांसाठी 294 कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातून आमदार राजेश पवार, आमदार आनंदराव तिडके, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार श्रीजया चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे पालकमंत्री अतुल सावे, खासदार अशोक चव्हाण व विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर सहभागी झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रारुप आराखड्यास मान्यता देताना, अतिरिक्त मागणीबाबत शक्य तितका जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल...
error: Content is protected !!