Sant Motiram Maharaj ; आळंदी येथे संत मोतीराम महाराज पुरस्काराने हभप।आत्माराम महाराज रायवाडीकर सन्मानित , संत पुरस्काराचे वितरण – NNL
लोहा l गेली चारहून अधिक दशक संत वाङमय व संतांचे विचार किर्तन प्रवाचनाच्या माध्यमातील अनेक गावात निरपेक्ष भावाने पोहचविणारे हभप आत्माराम महाराज रामेज्वार रायवाडीकर याना संत मोतीराम महाराज पुरस्काराने देवाची आळंदी येथे खासदार संजय जाधव लोकमत समूहाचे संपादक संजय आवटे, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष हभप विठ्ठल पाटील यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
हभप आत्माराम महाराज रामेज्वार हे सत्तरच्या दशकात बीए मराठी पदवीधर आहेत.त्याचा संत साहित्यात गाढा अभ्यास असून प्रभावी वकृत्व आणि विविध विषयाचे ज्ञान व्यासंग खूप आहे.
गेली चाळीसहून अधिक वर्ष झाली ते अविरतपणे भजन कीर्तन प्रवचन करत संतांचे विचार सर्वसामान्य माणसा पर्यंत पोहचवित आहेत .ज्ञानेश्वरी पारायण , हरिनाम सप्ताह, संत मोतीराम महाराज दिंडी असेच एकादशी व अन्य प्रसंगानुरूपनिमित्ताने भजन कीर्तन व प्रवचन नित्यनियमाने जुना लोहा येथे करतात त...
