district sports awards : मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण
नांदेड| क्रीडा व युवक सेवा संचालनालय आयुक्त व नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हयात दरवर्षी जिल्हा क्रीडा पुरस्कार (district sports awards) वितरीत करण्यात येतो. यामध्ये जिल्हयातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत खेळाडू पुरुष, महिला व दिव्यांग यांनी केलेल्या कार्याचे, योगदानाचे मुल्यमापन व्हावे त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांच्या पासुन इतरांनी प्रेरणा घ्यावी या हेतून जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. त्याकरीता जिल्हयातील क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू (पुरुष, महिला व दिव्यांग) यांच्याकडून सन 2020-21, 2021-22, 2022-23, व 2023-24 (4 वर्षे) या वर्षातील पुरस्काराकरीता अर्ज मागविण्यात आले होते.
या पुरस्काराकरीता प्राप्त झालेल्या अर्जाची जिल्हा क्रीडा पुरस्कार निवड समिती मार्फत छाननी करण्यात आली असून गुणांकनानुसार वर्षेनिहाय पुरस्कारसाठी पात्र झालेल्या पुरस्कारार्थीची...
