Dhadak Morcha ; उमरखेड नगर परिषदेवर नागरी सुविधांसाठी सीटू आणि लोकविकासचा धडक मोर्चा – NNL
उमरखेड | लोकविकास समन्वय संघर्ष समिती आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) च्या वतीने दि.८ ऑक्टोबर रोजी नाग चौक येथून दुपारी एक वाजता नगर परिषद उमरखेड वर धडक मोर्चा काढण्यात आला.
उमरखेड नगर परिषद क्षेत्रातील लोकशाहीर डॉ.कॉ.अण्णा भाऊ साठे मागासवर्गीय गृह निर्माण संस्थे मध्ये मागील २५ वर्षांपासून कोणत्याही नागरी सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. तेथे रस्ते, नाल्या, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट, खेळाचे मैदान,ओपन स्पेश, सौचालय, घरकुल आदी मूलभूत आणि नागरी सुविधा स्वातंत्र्याच्या ७७ वर्षात पुरविण्यात आल्या नाहीत. सदरील मागासवर्गीय व मातंग समाजाची वस्ती असलेला परिसर हा माजी आमदार देवसरकर यांच्या घरा शेजारी असलेल्या धोंगडे पीर जवळ आहे. उपरोक्त साठे नगरासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन खुपच उदासीन आहे.
शासनाकडून दलित वस्तीसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली असताना देखील तेथील रहिवास असणाऱ्या पीडितांना अजू...
