Mahur ; पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केली माहूर पोलीस ठाण्याची तपासणी
श्रीक्षेत्र माहूर l माहूर पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीच्या निमित्ताने पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी माहूर पोलीस ठाण्याला भेट देऊन येथे पोलीस पाटील महिला दक्षता समितीसह नागरिकांचे गऱ्हाणे ऐकून घेत शिवप्रकाश मुळे यांचे सह पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सपोनी शिवप्रकाश मुळे यांना रिवार्ड देऊन त्यांचे अभिनंदन केले
दि 29 रोजी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी वार्षिक तपासणी निमित्त माहूर पोलीस ठाण्याला भेट दिली येथे सपोनी शिवप्रकाश मुळे यांचे सह अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांचा सलामी देऊन सन्मान केला यावेळी पोलीस विभागाअंतर्गतच्या सर्व तपासणी अंती माहूर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष कामगिरी बजावल्याने त्यांचे अभिनंदन केले तसेच यावेळी आलेल्या पोलीस पाटील व महिला दक्षता समितीच्या मान्यवरांना त्यांनी संबोधित करून कायदा व सुव्यवस्थ...
