Chief Minister, Deputy Chief Minister : नांदेडच्या नवा मोंढा मैदानावर आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा संवाद -NNL
नांदेड| महिला सक्षमीकरणाचा नांदेड जिल्हयाचा लाभार्थ्यांचा आनंद मेळावा उद्या रविवारी 13 ऑक्टोबरला होणार आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवा मोंढा मैदानावर उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात अंतिम आढावा घेतला.
संपूर्ण जिल्ह्यातील यंत्रणेला सतर्क करण्यात आले आहे. उद्या जवळपास 250 बसेस याशिवाय शेकडो खाजगी वाहनाने जिल्ह्याच्या सर्व भागातून महिला उपस्थित राहणार आहे. एकट्या नांदेड शहरातून हजारो महिलांची उपस्थिती राहणार आहे. नांदेड महानगरपालिका व नांदेड ग्रामीण भागातील यंत्रणा यासाठी प्रयत्न करत असून आज महिलांना सुरक्षित आणणे, त्यांच्या खाणपणाची व्यवस्था करणे, त्यांच्या पार्किंगची व बैठक व्यवस्था करण्याबाबतची सूचनाही करण्यात आली.
राज्याच्या महिला व बालविकास विभागामार्फत हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ...
