सम्यक दृष्टी घालवते मानवाचे अज्ञान – दीपक कदम -NNL
नांदेड| मानवाला पचंद्रियांमुळे ज्ञान प्राप्त होते. परंतु सम्यक दृष्टी सद्विवेकाला जन्म देते. अविद्येचा विनाश हाच सम्यक दृष्टीचा उद्देश आहे. ती मिथ्या दृष्टीची विरोधीनी आहे. खऱ्या अर्थाने सम्यक दृष्टी मानवाचे अज्ञान घालवते असे प्रतिपादन येथील आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी केले. ते खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात आयोजित पौर्णिमोत्सव कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक, अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरु संघनायक भदंत पंयाबोधी थेरो यांच्यासह भिक्खू संघ, आंबेडकरवादी मिशन केंद्रप्रमुख दीपक कदम, जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉक्टर सिद्धार्थ जोंधळे, अशोक धुतराज, संजय गच्चे, प्रा. मधुकर जोंधळे, नायब तहसिलदार झगडे, संदेश वाठोरे, उपप्राचार्य साहेबराव इंगोले, प्रा. विनायक लोणे, प्राचार्य श्याम रोकडे, रामानंद सावंत, इंजि. भ...
