Daylight slaughter of innumerable teak trees : बेसुमार सागवान वृक्षाची दिवसाढवळ्या कत्तल ; माहूर वनविभाग अडकला हप्तेखोरीत -NNL
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| माहूर वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी हप्तेखोरीला सोकावल्याने तालुक्यात बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. वनक्षेत्र वाढविण्यासाठीची शासनाची 'झाडे लावा, झाडे जगवा' ही योजना हवेतच विरली आहे. बेसुमार सागवान वृक्षाची दिवसाढवळ्या कत्तल केली जात आहे. त्यामुळे माहूर तालुक्यातील वन विभागाचे चालले तरी काय ? असा सवाल उपस्थित होत आहे.
माहूर तालुका हा तसा दुर्गम भाग आणि डोंगरी विभाग म्हणूनच पहिले जाते. या विभागात वनविभागासह खाजगी मालकीच्या हद्दीतील आणि शेतकऱ्यांच्या शेताकडेला मोठ्या प्रमाणात आंबा, जांभूळ, साग, खैर, आदी प्रकारच्या झाडांची निलगिरी आणि बाभूळ झाडांच्या नावाखाली वन विभागाची कसलीही परवानगी न घेता विना परवाना बेसुमार कत्तल करण्याचे काम दिवसाढवळ्या सुरू असली तरी याचा कोणताही मागमूस वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना का लागला नाही? की लागूनही 'अर्थपूर्ण' तडजोडी मुळे याकडे दु...
