Dr. Mahendra Kadam ; बोलीभाषेच्या माध्यमातून संस्कृती उभी राहते-प्राचार्य डॉ.महेंद्र कदम – NNL
नांदेड | बोली एक संस्कृती उभी करत असते, एखादी बोली लुप्त झाली तर ज्ञानाचं मोठं संचित नष्ट होतं. त्यामुळे बोलीभाषेच्या संदर्भात काम करत असताना आपण एक संपूर्ण संस्कृती नव्याने स्थापित करत आहोत या भूमिकेतून शब्द संकलनापासून संशोधनापर्यंत प्रत्येक टप्प्यापर्यंत बोलीभाषा प्रेमींना कार्य करावे लागेल अशी अपेक्षा समीक्षक तथा भाषा अभ्यासक प्राचार्य डॉ. महेंद्र कदम (सोलापूर) यांनी व्यक्त केली.
मराठवाडी बोली बोलू कौतुके’व्हाट्सअप ग्रुपचा यावर्षीचा सालमेळा हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा (ता.वसमत) येथे रविवारी (दि.18) नरहर कुरुंदकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भरविण्यात आला. या मेळ्यास मार्गदर्शन करताना डॉ.कदम बोलत होते. अध्यक्षस्थानी नरहर कुरुंदकर शिक्षण संस्थेचे सचिव मुंजाजीराव इंगोले हे होते. विशेष अतिथी म्हणून नांदेडचे उपविभागीय महसूल अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर प...
