Cousin committed murder due to agricultural dispute : शेतीच्या वादातून चुलत भावाने केला खुन; आरोपी फरार -NNL
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| तालुक्यातील रुई येथे भावकीच्या शेती वादातून पोलीस पाटलांच्या घरी बैठक बसविण्यात आली होती बैठकीत तोडगा न निघाल्याने मोठ्या भावाने चुलत भावाला गावकऱ्यासमोर विळ्याने वार करून मयत परवेज पंटूस देशमुख वय २१ वर्ष यास ठार केल्याची घटना दि १८ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.
मयताचे वडील पंटुष शेरू साहेब देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादी वरून दि.१८ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास आरोपी पुतण्या साहील बबलु देशमुख याचा शेतीसंबंधी वाद असल्याने पोलीस पाटील परसराम भोयर यांचे घरी बैठक ठेवली होती. त्यावेळी तेथे मुलगा परवेज पत्नी साजराबी. पुतण्या पप्पू मीरसाहेब देशमुख, साहिल बबलू देशमुख, सोहेब बबलु देशमुख, भावजय फिरोजा देशमुख ,जावाई शे,इंरशाद तसेच सरपंच बाईचे पती गणेश राउत, पोलीस पाटिल परसराम भोयर, तंटामुक्ती अध्यक्ष उत्तमराव सुकळकर हे हजर होते. शेतीसंबंधी वाद असल्याने च...
