Homeक्राईमPolice destroy : 38 गुन्हयातील देशी व विदेशी दारुच्या 1377 बाटल्या पोलिसांनी...

Police destroy : 38 गुन्हयातील देशी व विदेशी दारुच्या 1377 बाटल्या पोलिसांनी केल्या नष्ट

नांदेड| पोलीस स्टेशन कुंटूर येथील प्रोव्हिविशनच्या 38 गुन्हयातील देशी व विदेशी दारुच्या 1377 बाटल्या किमंती 1,03,540/- रुपयाचा मुद्देमाल नाश करण्यात आला आहे.

अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी प्रोव्हिबिशनच्या गुन्हयातील न्यायालयात निकाली निघालेल्या गुन्हयातील जप्त मुद्देमाल नष्ट करणे बाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन कुंटूर येथे सन 2019 ते 2024 रोजी पावेतो महाराष्ट्र दारुबंदी कायदा अंतर्गत दाखल असलेले व मा. प्रथम श्रेणी न्यायालय, नायगांव यांनी निकाली काढलेल्या 38 गुन्हयातील जप्त मुद्देमाल देशी दारु भिंगरी संत्रा व विदेशी दारुचे एकुण 1377 बॉटल एकूण किंमती 1,03,540/- रुपयाचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.

हा मुद्देमाल नाश करण्याचे लेखी आदेश अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, कार्यालय नांदेड यांनी आज दि. 12/07/2025 रोजी ए. जी. कुरेशी, दारुबंदी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भोकर विभाग नांदेड व दोन पंचासमक्ष पोलीस स्टेशन कुंटूर याना दिले. त्यावरून येथे जप्त प्रोव्हिबिशनचा मुद्देमाल नाश करुन तसा पंचनामा तयार केला व मा.प्रथम श्रेणी न्यायालय, नायगांव व मा. वरिष्ठ कार्यालय यांना अहवाल सादर करण्याची कार्यवाही सुरु आहे.

हि कार्यवाही अबिनाश कुमार साहेब, पोलीस अधीक्षक, नांदेड (IPS), सुरज गुरव साहेब, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, जयप्रकाश गुट्टे, पोलीस निरीक्षक, उप विभाग बिलोली यांचे मार्गदर्शनाखाली विशाल डी. भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन कुंदुर, प्रकाश विरभद्र तांबोळी, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक, पो.स्टे. कुंदुर पोकॉ/755 स्वप्नील गोविंदराव हंबर्डे, पो.स्टे. कुंटुर ए.जी. कुरेशी दारुबंदी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भोकर विभाग नांदेड ए. बि. आंदेलवाड, पोलीस शिपाई, राज्य उत्पादन शुल्क, भोकर विभाग नांदेड यांनी केली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments