Shivaji Vidyalaya ; शिवाजी विद्यालयात संविधान जागर महाव्याख्यानमाला संपन्न
नवीन नांदेड l जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी संचलित शिवाजी विद्यालय सिडको नांदेड या शाळेत युवा प्रबोधन मंच व सत्यशोधक समाज प्रतिष्ठान तर्फे २०२५ या वर्षात संविधान अमृत महोत्सवानिमित्त 'संविधान जागर महाव्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संविधान संस्कृतीचे गाढे अभ्यासक प्रा.डाॅ.अनंत राऊत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक प्रा.एस.एम.देवरे तर प्रमुख पाहुणे म्हणून संविधान गौरव समितीचे जिल्हाउपाध्यक्ष व्ही.आर.आसोरे व शाळेचे पर्यवेक्षक व्ही.एस.पाटील उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी बोलतांना प्रा.डाॅ.अनंत राऊत सांगितले की ,जगातील सर्वांत मोठी आणि प्रबळ लोकशाही असलेल्या देशात सर्व जाती,धर्म, वेगवेगळी भौगोलिक परिस्थिती, विशिष्ट अंतर...
