Complicated surgery successful in Rainbow Hospital..! : रेनबो हाॅस्पिटल मध्ये गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी ..! -NNL
नांदेड| तेलंगणा मधील खम्मम जवळील एका अतिसामान्य कुटुंबातील ललिता चितोडीया ही एक महिला आठ महिन्याची गरोदर होती.तिचा रक्तदाब प्रचंड वाढून तीन झटके येतात.अन लघवीवाटे रक्तस्राव सुरू होतो,स्थानिक च्या दवाखान्यात नेले पण रुग्णाची मृतावस्था बघता दाखल करण्यास नकार मिळाला.खात्री तर नाहीच पण प्रयत्न केले तर सात ते आठ लाख खर्च सांगितला.नातेवाईकांनी तब्बल ७०० किलोमीटरचा प्रवास करीत नांदेडला रात्री उशिरा आणले.येथे ही तोच अनुभव आला.भितीने गांगरलेल्या ऋग्नासह नातेवाईकांचा एकच आक्रोश सुरू झाला व हवालदिल झाले.नाईलाजाने रुग्ण परत घेऊन निघाले असता कुणीतरी रेनबो हाॅस्पिटल ला नेण्याचे सुचवले.नातेवाईंकानी शेवटचा पर्याय म्हणून तिकडे नेले.
रेनबो हाॅस्पिटल हे नेहमीच संवेदनशील व मानवतेचे मंदीर समजले जाते.त्याचा प्रत्यय इथेही आला.डाॅ.गोपाल चव्हाणांनी रात्री उशिरा ही त्यांना ताबडतोब दाखल करुन घेत त्वरीत उपचार सुरू...
