Balaji Kalyankar ; आ. बालाजी कल्याणकर यांची शिवसेनेकडून मंत्रिमंडळात वर्णी लागावी – मुन्ना राठौर – NNL
नांदेड l नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्याने महायुतीला शतप्रतिशत कौल देऊन सर्वच उमेदवार विजयी केले आहेत. महायुतीकडून नांदेड जिल्ह्यामध्ये भाजपाचे पाच, शिवसेनेचे तीन व राष्ट्रवादी पक्षाचा एक आमदार निवडून आला आहे.
नांदेड जिल्ह्यातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची पुरती दाणादाण उडालेली आहे. २०१९ मध्ये नांदेड जिल्ह्यातून काँग्रेसचे चार आमदार निवडून आले होते. या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या हाती मोठा भोपळा आला आहे. महाविकास आघाडीचा एकही आमदार जिल्ह्यातून निवडून आला नाही. महायुतीकडून निवडून आलेल्या आमदारांना आता वेध लागले आहेत मंत्रिमंडळात वर्णी लागण्याचे. नांदेड जिल्ह्यातून शिवसेनेकडून आमदार बालाजी कल्याणकर तसेच भाजपाकडून मुखेडचे आमदार तुषार राठोड, नायगावचे आमदार राजेश पवार, किनवटचे आमदार भीमराव केराम व राष्ट्रवादीकडून पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पक्ष...
