Wednesday, July 1

Tag: Collector Abhijit Raut

शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत – NNL

शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत – NNL

नांदेड
नांदेड| जमिनीत ओल धरून ठेवेल असा मुरवणी पाऊस अद्याप जिल्ह्यामध्ये सर्वदूर झालेला नाही. त्यामुळे पेरणीसाठी घाई करू नका. मुबलक पाऊस झाल्यानंतरच पेरणीला सुरुवात करावी. अद्यापही पेरणी करण्याचे दिवस गेलेले नाहीत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पावसाची वाट न बघता पेरणीला सुरुवात केली आहे. मात्र जमिनीत चांगले पाणी मुरल्याशिवाय उत्तम पाऊस झाल्याशिवाय अशा पद्धतीचे धाडस करणे चुकीचे ठरू शकते, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. त्यामुळे कृषी तज्ञाच्या सल्ल्यावरून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अजूनही पेरणीसाठी वाट बघितली जाऊ शकते. तूर्तास पेरणी करू नका,असे आवाहन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले आहे. जिल्ह्यात नायगाव, उमरी, हदगाव, भोकर, देगलूर, माहूर, हिमायतनगर आदि तालुक्यामध्ये अद्यापही 100 मिलीमिटर पेक्षा कमी पाऊस झाला आहे. संपू...
मतदार यादीमध्ये आपल्या नावांची खातरजमा करण्यासाठी पुनरिक्षण कार्यक्रमात सहभागी व्हा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL

मतदार यादीमध्ये आपल्या नावांची खातरजमा करण्यासाठी पुनरिक्षण कार्यक्रमात सहभागी व्हा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL

नांदेड
नांदेड| मतदार यादी मध्ये आपले नाव नाही, आपले नाव व्यवस्थित नाही, छायाचित्र नाही, आपल्या नगरातील मृत व्यक्तींची नावे आहे, चुकीची नावे आहे अशा अनेक तक्रारी मतदानाच्या दिवशी केल्या जातात. मात्र या सर्व बाबींवर मात करण्याची संधी आता येणाऱ्या निवडणुकांसाठी भारत निवडणूक आयोगांनी मतदारांना दिली आहे. २५ जून पासून मतदान पुनरिक्षण कार्य नांदेड जिल्ह्यात सुरू झाला आहे. आपले नाव आहे अथवा नाही, याची खातरजमा करण्याची संधी आयोगाने दिली असून याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. भारत निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक विचारात घेऊन दि. 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (Special Summary Revision) घोषित केला आहे. 25 जुलै रोजी जिल्ह्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रारूप निवडणूक यादी तयार होणार आहे...
अतिवृष्टीची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL

अतिवृष्टीची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL

नांदेड
नांदेड| जिल्ह्यात गत दोन वर्षातील विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची मदत मिळविण्यासाठी गावातील तलाठ्याकडून विशिष्ट क्रमांक मिळवून घेत ई-केवायसी करून घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या खात्याची ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर 2022 मध्‍ये झालेल्‍या अतिवृष्‍टीमुळे, मार्च-एप्रिल 2023 मध्‍ये झालेल्‍या गारपिठ व अवकाळी पावसामुळे, जुन-जुलै 2023 मधील झालेल्या अतिवृष्टीमुळे व नोव्‍हेंबर 2023 मधील अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व कृषि सहायक यांची त्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. या त्रिस्तरीय समितीमार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. आजपर्यंत 5 लाख 14 हजार 183 शेतक-यांना 415 कोट...
error: Content is protected !!