CM cheated ST workers – Prakash Marawar : मुख्यमंत्र्यांनी एसटी कामगारांना फसविले – प्रकाश मारावार -NNL
नांदेड| एसटी कामगारांचे प्रश्न 20 ऑगस्ट पर्यंत सोडविण्याचे आश्वासन देऊन न पाळणे म्हणजेच एसटी कामगारांना फसविण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केल्याचे टीका एसटी सेनेचे विभागीय सल्लागार प्रकाश मारावार यांनी कृती समिती तर्फे आयोजित केलेल्या संप.धरणे आंदोलनात केली.
शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन वाढ. घर भाडे. 2018 ते 2024 पर्यंतचा महागाई भत्ता. सह इतर प्रश्न संदर्भात महाराष्ट्रातील तमाम एसटी बांधवा तर्फे कृती समिती स्थापन करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारंवार पत्र व्यवहार.मंत्र्याचे बैठका. मुख्यमंत्र्याच्या बैठकीत सचिवस्तरीय 20 ऑगस्टपर्यंत घेण्याच्या आश्वासन देऊन सुद्धाशब्द न पाळणाऱ्या मुख्यमंत्र्याच्या निषेधार्थ आज
नांदेड जिल्ह्यातील डेपोतून एकही लाल परी सुटली नाही. एसटी कामगार कृती समिती संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी धरणे आंदोलन करून एसटी बंद पाडले.
नांदेड बस स्थानकामध्य...
