Sunday, May 31

Tag: citizens are troubled

Traffic jam : हिमायतनगर शहरात मुख्य रस्त्यावर ट्रॅफिक जामची समस्या; नागरिक त्रस्त, सिग्नल व ट्रॅफिक पोलिसांची मागणी

Traffic jam : हिमायतनगर शहरात मुख्य रस्त्यावर ट्रॅफिक जामची समस्या; नागरिक त्रस्त, सिग्नल व ट्रॅफिक पोलिसांची मागणी

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| शहरातील मुख्य रस्त्यावर दररोज वाढणारी वाहतूक आणि वारंवार होणारे ट्रॅफिक जाम यामुळे नागरिक, विद्यार्थी तसेच दर्शनासाठी येणारे भाविक प्रचंड त्रस्त झाले आहेत. विशेषतः सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळेत रस्त्यावरून जाणे ही मोठी कसरत ठरत असून अपघाताचा धोका सुद्धा वाढला आहे. व्यवस्थित वाहतूक नियंत्रण नसल्याने वाहनचालकांचा संयम सुटत असून रस्त्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण होते. स्कूलबस, प्रवासी वाहने, एस टी महामंडळ बस, दोनचाकी-चारचाकी यांची कोंडी दररोज दिसून येत आहे. शहरातील वाढत्या वर्दळीला सक्षम असा वाहतूक नियोजनाचा अभाव जाणवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या गंभीर समस्येतून दिलासा मिळावा यासाठी नागरिकांकडून मुख्य चौकांवर ट्रॅफिक सिग्नल बसविणे, वाहतूक पोलीसांची स्वतंत्र नियुक्ती करणे, तसेच अनधिकृत पार्किंगवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. अनेक दिवसां...
Nagar Panchayat : हिमायतनगर शहरात घाणीचे साम्राज्य – नागरिक त्रस्त, नगरपंचायतीवर नाराजी

Nagar Panchayat : हिमायतनगर शहरात घाणीचे साम्राज्य – नागरिक त्रस्त, नगरपंचायतीवर नाराजी

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर│ दिवाळीच्या तोंडावर संपूर्ण शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, नागरिकांना दुर्गंधीयुक्त वातावरणात राहण्याची वेळ आली आहे. गल्लीबोळात तसेच मुख्य रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचल्याने स्वच्छतेचा पूर्णतः बोजवारा उडाला आहे. तुकामाई मंदिरासमोरून जाणाऱ्या रस्त्यावर तर अक्षरशः घाण आणि तीव्र दुर्गंधीने नागरिक हैराण झाले आहेत. पाय ठेवायलाही जागा नसल्याने रहिवाशांना घाणीतूनच ये-जा करावी लागत आहे. या भागात पंधरा दिवसांपासून कचरा न उचलल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, “आम्ही वारंवार नगरपंचायतीला घाण सफाईबाबत तक्रारी आणि सूचना केल्या, पण कोणतीही दखल घेतली गेली नाही. घरपट्टी आणि टॅक्स वसुलीकरिता मात्र नगरपंचायतीचे अधिकारी नियमित येतात, पण घाण साफ करण्यासाठी कोणीही येत नाही.” दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याची अप...
error: Content is protected !!