Gaurav Awards ; मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या शुभ हस्ते आरोग्य कर्मचाऱ्यांना गौरव पुरस्कार
नांदेड l आयआयटी मुंबई आणि जिल्हा परिषद नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या " सुपोषित नांदेड " कार्यक्रमांतर्गत बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या आणि कुपोषण दूर करण्याच्या उद्देशाने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जिल्हास्तरावर गौरव करण्यात आला. हा पुरस्कार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्दिष्ट 'सुपोषित नांदेड' कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील बालमृत्यू आणि अर्भक मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणणे, तसेच कुपोषण कमी करणे हा आहे. या कार्यक्रमा' अंतर्गत, जिल्ह्यातील प्रत्येक प्रशिक्षिकाणे अर्भक आणि बालकाला दत्तक घेऊन त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात यावी या विषयी मेघना कावली मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात सहभागी अधिकारी, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मच...
