Nanded ; नांदेडचे शेकडो दिव्यांग मुंबई येथील पावसाळी अधिवेशनात गनिमी काव्याने घुसुन मंत्रीमंडळाचे लक्ष केंद्रित करनार – राहुल साळवे, चंपतराव डाकोरे
नांदेड l दिव्यांगांच्या प्रलंबित विविध मागण्यां संदर्भात नांदेड येथील सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने शेकडो दिव्यांग मुंबई येथील पावसाळी अधिवेशनात गनीमीकाव्याने घुसुन मंत्रीमंडळाचे लक्ष केंद्रित करणार आहेत, नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील मंत्रीमंडळ, आमदार यांना जागे करण्यासाठी शेकडो दिव्यांग दिव्यांग नेते राहुल साळवे, चंपतराव डाकोरे यांच्या नेतृत्वाखाली कुठलीच पुर्वसुचना न देता गनीमी कावा करत पावसाळी अधिवेशनात घुसणार आहेत.
कारण, निवडणुकीत दिव्यांग,वृध्द,निराधारांचे कैवारी म्हणुन मतदान केंद्र दिव्यांगांच्या घरी नेऊन मते घेऊन सत्तेत गेल्यानंतर अधिवेशनात दिव्यांगांचे एकही प्रश्न आमदार लक्षवेधीत मांडत नाहित, दिव्यांगांसाठी असलेला आमदार निधी खर्च करीत नाहित, दिव्यांग दिड हजार रूपयात कसे जीवन जगत असतील याचा सुद्धा विचार करत नाहित त्यामुळेचे खालील मागण्यांच्या अनुषंगाने अधिवेशनात घुसना...

