Chaitanya Bapu Deshmukh : सेवा क्षेत्रात उद्योजकांना मोठ्या संधी- चैतन्य बापू देशमुख -NNL
नांदेड| महिलांनी गृह उद्योगांबरोबरच सेवा क्षेत्रात पदार्पण करून आपली आर्थिक उन्नती साधावी, कारण सेवा क्षेत्रात सध्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन उद्योजक चैतन्य बापू देशमुख यांनी केले. अंबिका मंगल कार्यालय येथे सुरू असलेल्या दीपोत्सव या भव्य प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी ते म्हणाले की, एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला आज उद्योगांमध्ये आपला ठसा उमटवीत आहेत याचा मला आनंद वाटतो. नांदेड शहरात अशा प्रकारे महिलांसाठी कार्यक्रम होत आहेत ही निश्चितच वाखाणण्याजोगी गोष्ट असल्याचे सांगून त्यांनी बी बी एन फाउंडेशनचे कौतुक केले. याप्रसंगी सौ. देशमुख म्हणाल्या की, महिलांची अशीच प्रगती झाली पाहिजे. अशा कार्यासाठी आमचे सदैव पाठबळ राहील. या प्रसंगी उद्योजक उमेश जालनेकर, श्रीपाद योगी, सुधीर देशमुख, विद्याधर कुंभोजकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
महिलांच्या कौशल्याल...
