Awareness week : प्रा.आरोग्य केंद्र, राजगड येथे जागतिक स्तनपान जनजागृती सप्ताह साजरा
किनवट| जागतिक स्तनपान जनजागृती सप्ताहनिमित्त १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या दरम्यान जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, मुख्य कार्यकारी अधिकारी कावली मेघना आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगिता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत संपूर्ण जिल्हाभरात विविध विभागाच्या सहकार्य व समन्वयाने विविध उपक्रम घेऊन स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला.
या जनजागृती सप्ताहा अंतर्गत गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.किशन गायकवाड यांच्या नेतृत्वात तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात स्तनपानाचे महत्व अधोरेखित करणारे जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून आज प्राथमिक आरोग्य केंद्र राजगड येथे सदर सप्ताह समारोपाच्या अनुषंगाने मार्गदर्शन व पुरस्कार वितरणाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत पांडुरंग मामीडवार समन्व...

