red-yellow stripe gang with black masks on their faces is on the rampage in Himayatnagar City : हिमायतनगरात लाल – पिवळ्या पट्टी गैंगचा तोंडाला काळा मास्क लाऊन धुमाकूळ; एकाच दिवशी चार दुकाने फोडून नगदी रक्कम व माल लंपास -NNL
हिमायतनगर,अनिल मादसवार| येथील पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बाजार चौक परिसरातील एक जनरल स्टोअर्स, दोन किराणा दुकान आणि मस्जिदजवळील एक कापड दुकानाचे शटर उचलून अज्ञात चोरटयांनी नगदी रक्कम व किंमती माल लंपास केला आहे. तसेच एक सोन्याचांदीचे दुकान, दोन कापड दुकान व इतर दोन दुकानाचे कुलूप फोडण्याचा प्रयत्न झाला मात्र चोरट्याना यश आले नाही. एकाच रात्रीतून एवढी दुकाने फोडण्याचा प्रयत्न झाल्याने व्यापारी वर्ग व नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी शहरासाठी कर्तव्यदक्ष पुरुष पोलीस जमादाराची नियुक्ती करून रात्रगस्त वाढवावी. तसेच तोंडाला काळा मास्क लाऊन धुमाकूळ माजविणाऱ्या लाल - पिवळ्या पट्टी गैंगचा बंदोबस्त करून चोरीच्या घटनां पुन्हा होणार नाही याची दक्षता घेऊन नागरिकांना सुरक्षा द्यावी अशी मागणी केली जात आहे.
हिमायतनगर शहरात गेल्या काही महिन्यपूर्वी झालेली चोरी उ...
