Media Awards-2024 : भारत निवडणूक आयोगामार्फत देण्यात येणा-या मीडिया पुरस्कार-2024 साठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन – NNL
मुबंई| राज्यातील प्रसारमाध्यमांनी सन २०२४ मध्ये मतदार साक्षरता व जनजागृती संदर्भात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी मीडिया ॲवार्ड २०२४ साठी भारत निवडणूक आयोगाने प्रसारमाध्यमांकडून प्रस्ताव मागवले आहेत. यामध्ये चार वर्गवारीमध्ये पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येकी एक मुद्रीत (प्रिंट मीडिया), टेलिव्हिजन (इलेक्ट्रॉनिक), रेडीओ (इलेक्ट्रॉनिक) आणि ऑनलाइन (इंटरनेट)/सोशल मीडियावरील सर्वोत्कृष्ट प्रचारासाठी पुरस्कार या चार पुरस्कारांचा समावेश आहे,असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
प्रसारमाध्यमांनी आपले प्रस्ताव दि. १० डिसेंबर २०२४ पर्यंत राजेश कुमार सिंग, अवर सचिव (संवाद), भारत निवडणूक आयोग, निर्वाचन सदन. अशोका रोड, नवी दिल्ली 110001. ईमेल: media-division@eci.gov.in , फोन नंबर: ०११-२३०५२१३१ केंद्रीय निवडणूक आयोग, दिल्ली यांच्या कार्यालयाकडे परस्पर पाठवायचे आह...
