War Honors Scheme ; युद्ध सन्मान योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन – NNL
नांदेड| युध्दात भाग घेतलेल्या आणि मेडल मिळालेल्या सैनिकांना, विधवांना एकरकमी 15 लाख युद्ध सन्मान योजनेतर्गंत तयार करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या अनुषंगाने 1965 आणि 1971 च्या युध्दात प्रत्यक्ष भाग घेतलेल्या आणि डिस्चार्ज बुकमध्ये समर सेवा स्टार किंवा पूर्वी स्टार/पश्चिमी स्टार मिळाल्याची नोंद आहे अशा माजी सैनिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांनी याबाबत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात 9 सप्टेंबर 2024 सायंकाळी 6 वाजेपर्यत नाव नोंद करावी. तसेच अधिक माहितीसाठी कल्याण संघटक (मोबाईल क्रमांक 8698738998/8707608283) वर संपर्क करावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.
अर्जासोबत माजी सैनिक /माजी सैनिक विधवा यांचे ओळखपत्र आणि डिस्चार्ज बुकची छायांकित प्रत, पेन्शन स्लीप, शेतजमीन आणि उपलब्ध घराचे क्षेत्रफळ याबाबतचा...
