Every Home in Ram : “घराघरात राम, जीवनात समाधान” — राधाकृष्ण जी महाराज यांचे हृदयस्पर्शी प्रतिपादन
हदगाव/हिमायतनगर/भोकर /नांदेड| हदगाव तालुक्यातील मौजे पिंपळगाव येथे सुरू असलेल्या पवित्र श्रीराम कथेमध्ये तिसऱ्या दिवशी कथाव्यास राधाकृष्ण जी महाराज यांनी आपल्या ओजस्वी, प्रभावी आणि भावपूर्ण वाणीने उपस्थित भाविकांच्या अंतःकरणाला स्पर्श करत अध्यात्मिक विचारांचा अमृतवर्षाव केला. त्यांच्या प्रवचनातून भक्ती, ज्ञान आणि सदाचार यांचा सुंदर संगम साधत जीवनाला योग्य दिशा देणारा संदेश देण्यात आला.
“घराघरात राम” — समाधानाचा खरा मार्ग
“प्रत्येकाने आपल्या घरामध्ये राम आणावा,” असे सांगताना महाराजांनी स्पष्ट केले की, ज्या घरात रामाचे स्मरण असते, त्या घरात आपोआप कीर्तन, अर्चन, गोसेवा आणि ज्ञानेश्वरी गाथेचा पवित्र वास निर्माण होतो. कुटुंबातील प्रत्येकाच्या सुख-दुःखाची काळजी घेणारा, सर्वांना एकत्र बांधणारा जो भाव असतो, तोच खरा ‘राम’ असल्याचे त्यांनी अत्यंत प्रभावी शब्दांत मांडले.
ज्ञानाचे महत्त्व अ...
