Friday, May 15

Tag: by Caste Certificate Verification Committee

Samata Pandharvada : जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे “समता पंधरवडा ” विशेष मोहिमेचे आयोजन

Samata Pandharvada : जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे “समता पंधरवडा ” विशेष मोहिमेचे आयोजन

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे"समता पंधरवडा" आयोजित केला आहे. या पंधरवड्याच्या निमित्ताने 7 एप्रिल ते 14 एप्रिल, 2025 या कालावधीत विशेष मोहिम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या समता पंधरवड्यात विशेष मोहिमेतंर्गत जिल्हयातील इ.11 व 12 विज्ञान शाखेतील प्रवेशित विद्यार्थी, सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपापल्या संबंधित महाविद्यालयात ऑनलाईन भरलेला परिपूर्ण अर्ज जमा करुन जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावेत. तसेच सर्व कनिष्ठ विज्ञान शाखेच्या महाविद्यालयानी देखील या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त तथा सदस्य डॉ. छाया कुं. कुलाल यांनी केले आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेद्वारे देशाला समता...
error: Content is protected !!