District Newspaper Development Board : जिल्हा वृत्तपत्र विकास मंडळ आणि ‘सकाळ’ माध्यम समुहातर्फे सायकल स्पर्धा -NNL
नांदेड| वृत्तपत्र विक्रेता दिन व २५ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा वृत्तपत्र विकास मंडळ आणि 'सकाळ ' माध्यम समुहाच्या वतीने बुधवारी (ता.९) वृत्तपत्र विक्रेता बांधवांसाठी सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सकाळी नऊ वाजता चैतन्य नगर शिवमंदिर ते सांगवी दरम्यान, होणार आहे.
वर्षातील ३६५ दिवस उन, पाऊस, थंडी या कशाचीही तमा न बाळगता घरोघरी वृत्तपत्र टाकण्याचे काम विक्रेता बंधू करतात. अनंत अडचणींना तोंड देत विक्रेता बंधू लोकापर्यंत वर्तमानपत्राच्या माध्यमातून माहिती, ज्ञान पोहचविण्याचे काम करतात. रोजच्या या धकाधकीच्या जीवनशैलीत त्यांनाही आपल्यातील उपजत कलागुणांना वाव देता यावा, यासाठी जिल्हा वृत्तपत्र विकास मंडळ आणि 'सकाळ ' माध्यम समुहाच्या वतीने बुधवारी (ता.९) वृत्तपत्र विक्रेता बांधवांसाठी सायकल स्पर्धेचे आयोजन केले आहे. चैतन्य नगर शिवमंदिर ते सांगवी व परत शिवमंदिर अशी ही स्पर्ध...
