Awareness Rally : अंगदान जीवन संजीवनी अभियान अंतर्गत नांदेड येथे जनजागृती रॅली संपन्न
नांदेड| अवयवदान दिनानिमित्त आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर, महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच आयुक्त आरोग्य सेवा, आयुक्तालय मुंबई यांच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यभरात ०३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत अंगदान जीवन संजीवनी अभियान राबविण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आज मेघना कावली मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखून रॅलीची सुरुवात करण्यात आली.
मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा १९९४ नुसार ३ ऑगस्ट १९९४ रोजी भारतामध्ये पहिले हृदय प्रत्यारोपण प्रक्रिया पार पडल्यामुळे ३ ऑगस्ट हा दिवस अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो .हा उद्देश समोर ठेवून या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
ही रॅली शहरातील आय टी आय कॉर्नर येथील महात्मा फुले पुतळ्यापासून श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक, जिल्हा रुग्णालय नांदेड अशी ...
