Successful Double Valve Replacement Surgery : यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा येथे यशस्वीरीत्या डबल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट सर्जरी..! -NNL
यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा येथे यशस्वीरीत्या डबल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट सर्जरी..!
३२ वर्षीय रुग्णावर अंत्यत जोखमीच्या जटील हृदय शस्त्रक्रियेला यश
नांदेड| महाधमनी स्टेनोसिस आणि मिट्रल स्टेनोसिस ला प्राणांतिक त्रास होणाऱ्या नांदेड येथील मूळ रहीवाशी असलेल्या ३२ वर्षीय श्री दत्तात्र्यय माजरवाड या रुग्णावर कार्डीयाक सर्जन डॉ.सत्या श्रीधर काळे यांनी यशस्वीरीत्या डबल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट सर्जरी पार पाडत रुग्णाला जिवनदान दिले आहे सदर रुग्णावर ४ वर्षांपूर्वी डबल व्हॉल्व्ह बदलण्यात आले होते त्यानंतर तो आता चांगले आणि उत्पादकपणे विनाअडथळा आपले कामे करत आहे अशी माहीती हॉटेल चंद्रलोक येथील पत्रकार परिषेदेत देण्यात आली
श्री दत्ता माजरवाड यांना कोरोना काळात अचानकपणे श्वास लागणे, धडधडणे (हृदयाचे ठोके वाढणे), झोपू न शकणे आदी वाढत्या त्रासामुळे ते आमच्याकडे तपासणीसाठी आले आणि ईसिजी, टू-डी इको करून त्य...
