Bhagwat Kardad : पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी मी नेहमीच तत्पर – डॉ.भागवत कराड
छत्रपती संभाजीनगर| पत्रकार हे वर्षानुवर्ष समाजासाठी काम करतात. त्यांच्या समस्या मी नेहमीच गांभीर्याने घेत असतो. त्यामुळे पत्रकारांच्या आरोग्यविषयक व रेल्वेविषयक समस्या सोडविण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करीन, असा विश्वास माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केला. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी सलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनात डॉ.भागवत कराड बोलत होते.अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख होते.
यावेळी व्यासपीठावर परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मंजूरभाई शेख, उपाध्यक्ष गणेश मोकाशी, गो.पी.लांडगे, लातूर विभागीय...
