Tree stumps and plantations | जि.प.प्रा. शाळा इंदिरानगर शेलगाव येथे वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न -NNL
नांदेड| जि.प.प्रा. शाळा इंदिरानगर शेलगाव ता. अर्धापूर येथे पर्यावरण जनजागृतीचा हेतू डोळ्यासमोर ठेवून वृक्षदिंडी व वृक्षारोपण अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. पंढरपूरच्या वारीचा व दिंडीचा आदर्श डोळयासमोर ठेवून शाळेकडून नाविण्यपूर्ण वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी ‘वारकरी वेष’ परिधान करुन व वृक्षाचे रोपटे हाती घेऊन आम्ही पर्यावरण वारकरी, झाडे लावू घरोघरीच्या जयघोषात वृक्षारोपणाचा संदेश दिला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांच्या टोपीवरती लिहिलेल्या पर्यावरण वारकरी या मजकुराने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले व पर्यावरण रक्षणाचा मौलीक संदेश लोकांना दिला. यावेळी गावातील मुख्य रस्त्याने ‘वृक्षदिंडी’ काढण्यात आली. यामध्ये इंदिरानगर शेलगावचे सरपंच पंजाबराव राजेगोरे, कृतीशिल ग्रा.पं. सदस्य तथा शिक्षणप्रेमी नागरिक गजानन पांचाळ, शिक्षणप्रेमी व समाजसेवी नागरिक सुनि...
