Thursday, May 14

Tag: at Malegaon Yatra; Farmers devoted

Malegaon Yatra : माळेगाव यात्रेत गुरुवारी कृषी व पशु प्रदर्शन; कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा होणार सत्कार -NNL

Malegaon Yatra : माळेगाव यात्रेत गुरुवारी कृषी व पशु प्रदर्शन; कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा होणार सत्कार -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड| श्रीक्षेत्र माळेगाव येथे सुरु असलेल्यार श्री खंडोबाच्या यात्रेत आज जिल्हा परिषदेच्यावतीने गुरुवार 2 जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांत कृषी प्रदर्शन, अश्व, श्वान, कुक्कुट प्रदर्शन, कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार, महिलांसाठी व बालकांसाठी स्पर्धा तसेच लावणी महोत्सव मुख्य आकर्षण ठरणार आहे. उद्या गुरुवारी सकाळी 10 वाजता अश्व, श्वान व कुक्कुट प्रदर्शन व विविध स्पर्धांचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार डॉ. अजित गोपछडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तर आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार तुषार राठोड, आमदार बालाजीराव कल्याणकर तसेच जिल्हा परिषद संवर्धन अधिकारी डॉ. प्रवीणकुमार घुले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ...
error: Content is protected !!