Thursday, May 14

Tag: at Kiwala was held with great enthusiasm

wrestling tournament :  किवळा येथे कुस्ती दंगल उत्साहात; अच्युत टरके–खाजा परभणी यांची मानाची कुस्ती बरोबरीत

wrestling tournament : किवळा येथे कुस्ती दंगल उत्साहात; अच्युत टरके–खाजा परभणी यांची मानाची कुस्ती बरोबरीत

नांदेड, स्पोर्ट्स
नवीन नांदेड | नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील किवळा येथे हजरत शाहुसेन मस्तान साहेब दर्गा ऊरूस शरीफ निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती दंगलीत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील नामवंत पहेलवानांनी सहभाग नोंदवून आखाडा गाजवला. पारंपरिक जल्लोष, हलगीचा नाद आणि प्रेक्षकांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसर कुस्तीमय झाला होता. या मानाच्या कुस्ती दंगलीची सुरुवात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर रूद्रगिर महाराज यांच्या हस्ते कुस्ती दंगलीचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास माजी सभापती शंकर पाटील ढगे, सरपंच प्रतिनिधी साईनाथ पाटील टरके, तसेच ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुस्ती दंगलीतील शेवटची आणि मानाची कुस्ती किवळा येथील माळेगाव केसरी अच्युत दिगंबर टरके व खाजा (परभणी) यांच्यात झाली. दोन्ही पहेलवानांनी आक्रमक व तांत्रिक डावपे...
error: Content is protected !!