Does BJP’s math fail somewhere? : भाजपाचे कुठेतरी गणित बिघडते का ? किनवट माहूर विधानसभा मतदारसंघात भाजपला चिंतन करण्याची गरज -NNL
किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट विधानसभा मतदार क्षेत्रातील विधानसभेची निवडणूक अत्यंत रंगतदार ठरण्याची शक्यता आहे. मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदीप नाईकांना त्यांच्या आजूबाजूच्या पदाधिकार्यांवर जनमत नाराज झाल्याचा परिणाम मतदानावर झाला. मतदारांनी हुलकावणी दिल्याने पराभवाचा झटका सोसावा लागला. म्हणतात ना, आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा तसा भाजपा उमेदवाराचा नकारार्थी मतदारांचा कौल निर्णायक करुन अनपेक्षीत विजय झाला. भाजपाने ताकद पणाला लाऊनही केवळ तेरा हजाराचे मताधैक्य म्हणजे गौरवशाली बाब नाही. त्यावेळच्या बर्याचअंशी मतदारांनी आज मितीस भाजपाची साथ सोडल्यामुळे भाजपासाठी हा चिंतनाचा विषय ठरु शकतो.
त्यातच किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भीमराव के राम यांनी कोट्यावधी रुपयाची कामे किनवट माहूर विधानसभा मतदारसंघांमध्ये खेचून आणली. पण त्यांच्या कामाची कुठे उद्घाटन ...
