Guardian Minister Atul Save : गुणवत्तेसोबतच सुरक्षित शहर म्हणून नांदेडचा लौकिक – पालकमंत्री अतुल सावे
नांदेड| नांदेड शहर एक एज्युकेशन हब म्हणून ओळखले जात आहे. मराठवाड्यासह राज्यभरातून येथे शिक्षणासाठी विद्यार्थी येत आहेत. शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना शहरात सुरक्षित, निर्भय वातावरण मिळावे यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून गुणवत्तेसोबत सुरक्षित शहर म्हणून नांदेडचा लौकिक निर्माण होईल, असा विश्वास पालकमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.
आज कोनाळे कोचिंग क्लासेस येथे जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयानी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, कोचिंग क्लासेसचे आर.बी.जाधव, ...
