Maratha : आरक्षण घेतल्याशिवाय आता परतणार नाही मराठा सेवकांचा निर्धार!
नांदेड| मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबई आझाद मैदान येथे आमरण उपोषण आंदोलनाचे जाहीर केले होते, त्यानुसार त्यांनी महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना दि.26 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी ता. अंबड जि.जालना या ठिकाणी मुक्कामासाठी बोलवले होते.
दि. 27 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता अंतरवाली येथून मनोज जरांगे पाटील समाज बांधवांसह मुंबईच्या दिशेने निघणार होते, त्याच अनुषंगाने पूर्ण मराठवाड्यात गेले दोन महिने झाले मराठा सेवकांनी वाड्या–तांडे अक्षरशः झोडपून काढले. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी कशी रास्ता आहे, ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण का हव आहे, मराठा समाजाची खालवलेली परिस्थिती, विद्यार्थ्यांची दशा सर्वच गोष्टी या विचार करायला भाग पाडणाऱ्या नक्कीच आहेत.
मराठा समाज आज घडीला हतबल झाला असून मराठा समाजाची आर्थिक विवंचना दूर करायचे असेल सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजात...
