print media : प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियात रोजगाराच्या संधी उपलब्ध -अनुपमा खानविलकर
नांदेड| भाषेवरती प्रभुत्व आणि या क्षेत्रामध्ये काम करण्याची आवड तुमच्यामध्ये असेल तर प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया या दोन्ही क्षेत्रामध्ये नवोदित पत्रकार होऊ इच्छिणार्या युवक आणि युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. असे प्रतिपादन झी 24 तासच्या प्रसिध्द वृत्तनिवेदिका अनुपमा खानविलकर यांनी केले.
महात्मा गांधी मिशन संचलित पत्रकारिता - माध्यमशास्त्र महाविद्यालय नांदेड आयोजित दर्पण दिनाचे औचित्य साधून पत्रकारांचा सन्मान सोहळा आणि प्राचार्य डॉ.गणेश जोशी यांनी संपादीत केलेले ‘भारतीय पुलिस और मीडिया’ या पुस्तकाचे प्रकाशन दि.30 जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इलेक्ट्रॉनिक मीडियामधील आव्हाने या विषयावर खानविलकर या बोलत होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
या कार्यक्रमास ...
