CIDCO ; सिडको येथे अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सचा छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार सोहळा संपन्न.
नवीन नांदेड l छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेला नवीन नांदेड सिडको येथील रुबी हॉटेलमध्ये अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्स चा छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार सोहळा 26 जुनं रोजी मोठ्या थाटा मध्ये संपन्न झाला,या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी व नागरीकांच्यी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
आंबेडकरी चळवळीतील योगदानाबद्दल अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सच्या वतीने मराठवाड्यातील आणि विदर्भातील काही निवडक आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले,यामध्ये चंद्रा भाऊ ठाकरे,प्राचार्य अरुण कांबळे, जयप्रकाश वाघमारे,ॲड.हरि दर्शनवाड, नंदाताई लोखंडे,वेणूताई जोगदंड, मनीषा शिंदे,चेतना जाधव,राधिका चिंचोलीकर, बजरंग ताटे,राजेश घोडे,बाबुराव गालफाडे, लक्ष्मण वाघमारे,बाला...
