public toilet works : सांडपाणी-घनकचरा व्यवस्थापन व सार्वजनिक शौचालयांची कामे पूर्ण करा
नांदेड| सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन तसेच सार्वजनिक शौचालयांची कामे येत्या 10 जानेवारी पूर्वी पूर्ण करून त्यासाठीचा उपलब्ध निधी पूर्णतः खर्च करण्यात यावा, असे निर्देश जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी मयूर आंदेलवाड यांनी दिले.
नायगाव पंचायत समिती सभागृहात आज ग्रामपंचायत अधिकारी यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस गट विकास अधिकारी पी. टी. वैष्णव, विस्तार अधिकारी पी. एस. जाधव, गणेश टोनगे, स्वच्छता तज्ञ विशाल कदम, समाजशास्त्रज्ञ महेंद्र वाठोरे, माहिती-शिक्षण व संवाद सल्लागार नंदलाल लोकडे तसेच गट समन्वयक दत्ता इंदूरकर उपस्थित होते.
उप मुख्य कार्यकारी अधिकारी मयूर आंदेलवाड यांनी यावेळी नायगाव तालुक्यात सुरू असलेल्या सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. संबंधित सर्व कामे तात्काळ पूर्ण...
