Marathi State Drama Competition : सोमवारपासून रंगणार हौशी मराठी राज्य नाटय स्पर्धा; नांदेडसह परभणीतील कलावंताचा राहणार सहभाग -NNL
नांदेड| महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६३ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा नांदेड येथील कुसुम सभागृहात सोमवार ता.२५ नोव्हेंबरपासून ते ६ डिसेंबर दरम्यान सायंकाळी सात वाजता नाट्यप्रयोग सादर केले जाणार आहेत. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभिशन चवरे यांनी नमूद केले, नांदेड केंद्रावर एकूण १३ संघ सहभागी होणार आहेत. नांदेड शहरासह परभणी जिल्ह्यातील विविध संघांचे प्रयोग या केंद्रावर सादर होतील.
सोमवारी ता. २५ झपुर्झा सोशल फाउंडेशन, परभणीच्या वतीने विनोद डावरे लिखित आणि दिग्दर्शित शापित सेवा नाटकाने स्पर्धेला सुरुवात होईल. त्यानंतर मंगळवारी ता. २६ स्वप्नरंग सांस्कृतिक संस्था, नांदेडच्या वतीने इरफान मुजावर लिखित आणि दिनेश कवडे दिग्दर्शित व्हाईट पेपर सादर होईल. बुधवारी ता.२७ सां...
