rail bridge ; रस्ता व रेल्वे पुलाच्या कामामुळे वाहनासाठी पर्यायी मार्ग
नांदेड | निळा जं. शंकरराव चव्हाण चौक-गाडेगाव-ब्राम्हणवाडा-मुगट-आमदुरा-वासरी-शंखतिर्थ-माळकौठा-बळेगाव-कारेगाव फाटा-बाभळी फाटा-बेलूर-नायगाव ते राज्य सिमा रस्त्याची सुधारणा करण्यासाठी तसेच प्रजिमा-83 जि. नांदेड याकामांतर्गत गाडेगाव येथील रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम प्रगतीत असल्याने जडवाहने पर्यायी मार्गाने वळविण्याबाबत अधिसुचना निर्गमीत करण्यात आली आहे.
मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी राहूल कर्डिले यांनी संबधीत विभागाने दिलेल्या अटी व शर्तीनुसार उपाययोजना करतील या अटीवर तसेच, संबधीत विभागाने पुढील उपाययेाजना करुन तसेच 20 फेब्रुवारी ते 20 मार्च 2025 पर्यंत नमुद केलेल्या पर्यायी मार्गाने सर्व प्रकारची वाहने वळविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
वाहनांसाठी प्रतिबंधीत करण्यात आलेला मार्ग निळा जं. शंकरराव चव्हाण चौक-गाडेगाव-ब्राम्हणवाडा-मुगट व निळा ...
