Chief Minister Devendra Fadnavis : पानिपत शौर्य स्मारकाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -NNL
नवी दिल्ली| मराठ्यांनी राष्ट्र संरक्षणार्थ पानिपतच्या युध्दात जीवाची बाजी लावून लढा दिला. या युद्धाच्या शौर्य स्मारकासाठी महाराष्ट्र शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल,अशी ग्वाही महाराष्ट्र्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnvis) यांनी दिली.
पानिपत युध्दाला (Panipat War)२६४ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पानिपत येथील कालाआम परिसरात मराठा शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते. येथे उपस्थित होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा वीर योद्ध्यांना अभिवादन करण्यासाठी गत १९ वर्षांपासून शौर्य समितीच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या पानिपत कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रीडा तथा युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे राजशिष्टाचार तथा पणन मंत्री जयकुमार रावल, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, खास...
