Illigal Fartilizer ; शिवणी परिसरात विना परवाना खताची विक्री केल्याप्रकरणी कृषी विभागाची कारवाई
किनवट,परमेश्वर पेशवे। विना परवाना खताची विक्री केल्या प्रकरणी कृषी विभागाकडून कारवाई करण्यात आली असून, 14 लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत खताचा टेम्पो ताब्यात घेण्यात आला आहे.
तेलंगाणा राज्यातून महाराष्ट्रातील सिमावर्ती भागातील गावात विना बिल खताची विक्री करत असल्याची गुप्त माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्याला मिळताच दि. 22 मे गुरुवार रोजी शिवणी परिसरात सापळा रचत टि एस यु इ 6422 क्रमाकांचा टेम्पो श्री कृष्ण मंदिरा जवळ पकडून या गाडीची चौकशी केली असता विना बिल खताची विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. सदरील गाडी ताब्यात घेऊन कृषी विभागाचे अधिकाऱ्यांनी इस्लापुर पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे. या प्रकरणी कृषी विभागाच्या एका कर्मचाऱ्यांच्या फिर्यादी वरून एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील टेम्पोची किंमत 14 लाख व खताची किंमत 64 हजार 422 रु. असे मिळून 14 लाख 64 हजार रुपयांच...
