Himayatnagar News : हिमायतनगरात महावितरणच्या अनधिकृत कामकाजावर प्रशासनाची धडक कारवाई
हिमायतनगर,अनिल मादसवार | हिमायतनगर तालुक्यात HVDS 1×16 KVA रोहित्राच्या अनधिकृत बसवणुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर महावितरण प्रशासनाने तात्काळ धडक कारवाई केली आहे. संबंधित रोहित्र तसेच विद्युत लाईनचे कंडक्टर काढून उपविभागीय कार्यालयात जप्त करण्यात आले असून, या प्रकरणात जबाबदार धरलेल्या दोन कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.
या कारवाईबाबत महावितरणकडून देण्यात आलेले लेखी आश्वासनपत्र मिळाल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर, महविरचंद श्रीश्रीमाळ, नगरसेवक सुभाष बलपेलवाड यांच्या उपस्थितीत ७ फेब्रुवारी (शनिवार) रोजी अमरण उपोषण मागे घेण्यात आले.
या प्रकरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी ३ फेब्रुवारी २०२६ पासून हिमायतनगर उपविभ...
