महाभ्रष्ट भाजपा सरकार विरोधात काँग्रेसचे राज्यभर ‘चिखल फेको’ आंदोलन – NNL
मुंबई| राज्यातील असंवैधानिक सरकार हे शेतकरी, कामगार, तरुण, महिला, मागासवर्गीय, अल्पसंख्याक विरोधी आहे. या सरकारच्या जनविरोधी नितीविरोधात काँग्रेस पक्षाने एल्गार पुकारून राज्यभर चिखल फेको आंदोलन केले. वाढती महागाई, बेरोजगारी, NEET परिक्षेतील घोटाळा, खते, बियाणांचा काळा बाजार, वाढती गुन्हेगारी, अमली पदार्थांचा सुळसुळाट, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नी हे आंदोलन करून महायुती सरकारचा निषेध करण्यात आला.
मुंबईत काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, माजी मंत्री सुरेश शेट्टी, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आमदार भाई जगताप, चरणसिंह सप्रा, प्रदेश काँग्रेसचे खजिनदार डॉ. अमरजितसिंह मनहास यांनी चिखल फेको आंदोलनात सहभाग घेतला. नागपूरमध्ये शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले, यावेळी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्त...
