Nominations himaytnagar : नामनिर्देशन छाननीनंतर हिमायतनगर नगराध्यक्ष पदासाठी १२ तर नगरसेवकपदासाठी 102 उमेदवार रिंगणात
हिमायतनगर, अनिल मादसवार| सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर नगरपरिषदेसाठी घेतलेल्या नामनिर्देशन छाननीनंतर निवडणुकीचे संपूर्ण चित्र मोठ्या प्रमाणात स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी अर्जांची छाननी पूर्ण होताच, स्पर्धा किती अटीतटीची होणार याची दिशा आता ठरू लागली आहे.
नगराध्यक्षपदासाठी १२ उमेदवार पात्र – ९ अपात्र - नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या 21 अर्जांपैकी 12 अर्ज पात्र, तर 9 अर्ज अपात्र ठरले आहेत. छाननीतून पात्र ठरलेल्या उमेदवारांमध्ये सर्व प्रमुख पक्षांचे दावेदार असल्याने पुढील टप्प्यातील मागे घेणे आणि पक्षांतर्गत चर्चांवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
नगरसेवकपदासाठी 102 उमेदवार रिंगणात – 87 अर्ज बाद - हिमायतनगरच्या एकूण 17 प्रभागांमधून 189 अर्ज दाखल झाले होते. यापैकी छाननीनंतर 102 अर्ज पात्र, तर 87 अर्ज अपात्र ठरले आहेत. त्यामुळे प्रभागनिहाय चुरस ...
