Wednesday, May 13

Tag: after pressure from CPI(M) protest

Action against electricity ; माकपच्या आंदोलनाच्या दबावानंतर वीज वितरण कंपनीवर कारवाई

Action against electricity ; माकपच्या आंदोलनाच्या दबावानंतर वीज वितरण कंपनीवर कारवाई

नांदेड, सोशल वर्क
नांदेड। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) निवेदनानंतर नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अनियमित कारभाराची गंभीर दखल घेतली आहे. वीजपुरवठ्यातील वारंवार खंड,अधिकारी - कर्मचारी यांच्या मार्फत ग्राहकांना व सामान्य नागरिकांना प्रतिसाद न देणे, मोबाईल फोन बंद करून ठेवणे किंवा फोन न घेणे,अवाजवी बिलिंग, सतत होत असलेली वीज खंडित समस्या आणि ग्राहक तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत माकपचे सचिव कॉ.गंगाधर गायकवाड यांनी दि.९ मे रोजी निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. १० मे रोजी जिल्हाधिकारी यांनी आपल्या कक्षात महावितरणची आढावा बैठक घेतली. माकपच्या तालुका समितीने गेल्या आठवड्यात माध्यमातून निवेदन सादर करून नांदेड शहर आणि ग्रामीण भागातील वीज समस्यांवर त्वरित कारवाईची मागणी केली होती. शहरामध्ये तासन्तास वीजपुरवठा खंडित होतो, जादा बिले येत आहेत...
error: Content is protected !!