‘Loknete Gopinathrao Munde Panpoi : ॲड. दिलीप ठाकूर यांच्या वतीने लोकनेते गोपीनाथराव मुंडे पाणपोई’ या उपक्रम
नांदेड| गुढीपाडव्याच्या पावन मुहूर्तावर समाजसेवेची परंपरा जपत धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या वतीने ‘लोकनेते गोपीनाथराव मुंडे पाणपोई’ या उपक्रमाचा २५ वा वर्ष सुरू करण्यात आला. गुरुवारी भाजपा महानगराध्यक्ष अमर राजूरकर यांच्या हस्ते या पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान मोर्चाचे राम अय्यर होते, तर भाजपा उपाध्यक्ष बागडया यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोप करताना राम अय्यर म्हणाले की, “निष्ठावान कार्यकर्ते असूनही स्वीकृत सदस्य पद न मिळाल्यानंतरही ॲड. दिलीप ठाकूर यांनी नाराजी न दाखवता सेवा कार्य सुरू ठेवले. आजच्या राजकारणात अशी वृत्ती दुर्मिळ असून, त्यांच्या कार्यातून वेगळेपण स्पष्ट दिसून येते.”
गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून वाघी-नाळेश्वर सर्कल परिसरातील १६ गावांतील प्रवासी तसेच मिलरोड वसाहतीतील नागरिकांसाठी उन्हाळ्यात शीतपाणी उपलब्ध करून देण...
