Kinwat ; विधानसभा निवडणूकीसाठी किनवटमध्ये प्रशासकीय यंत्रणा सज्ज – NNL
किनवट, परमेश्वर पेशवे l महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता 83-किनवट विधानसभा मतदारसंघात बुधवारी (ता.20) सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान 331 मतदान केंद्रावर राखीव यंत्रासह 397 नियंत्रण युनिट, 794 बॅलेट युनिट व 430 व्हीव्हीपॅट मतदान यंत्राद्वारे निर्भय, निःपक्ष व मुक्त वातावरणात मतदान घेण्यासाठी 706 पोलिस अधिकारी -कर्मचाऱ्यांच्या तैनातीसह तीन हजारांहून अधिक अधिकारी कर्मचारी यांचेसह प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मेघना कावली (भाप्रसे) यांनी सांगितले.
किनवट व माहूर या तालुक्याचा समावेश असलेल्या या विधानसभा मतदारसंघात 1 लाख 42 हजार 273 पुरुष, 1 लाख 36 हजार 381 स्त्री व 11 ईतर असे एकूण 2 लाख 78 हजार 665 मतदार आहेत. 331 मतदान केंद्रापैकी सार्वजनिक बांधकाम उप विभाग क्र. 2 खोली क्र. 2 येथे एक दिव्यांगासाठी आणि जिल्हा परिषद केंद्रीय...
