Rising demand for homes priced above Rs 1 crore : एक कोटीपेक्षा अधिक किंमतीच्या घरांच्या मागणीत वाढ: प्रॉपटायगर डॉटकॉम -NNL
मुंबई| एप्रिल-जून या कालावधीत देशभरातील महत्त्वाच्या हाऊसिंग बाजारपेठांमध्ये एक कोटी आणि त्यापेक्षा अधिक किंमतीच्या घरांच्या संख्येत लॉन्च आणि विक्रीच्या बाबतीत उल्लेखनीय वाढ झाली असल्याचे प्रॉपटायगर डॉटकॉमकडे उपलब्ध असलेला डेटा दर्शवितो.
आरईए इंडियाच्या मालकीच्या या ऑनलाइन प्रॉपर्टी ब्रोकरेज फर्मच्या ‘रियल इनसाइट: रेसिडेन्शियल एप्रिल-जून २०२४’ नामक तिमाही अहवालानुसार, या तीन महिन्यांदरम्यान भारतातील आठ मोठ्या रेसिडेन्शियल मार्केट्समध्ये नवीन लॉन्च झालेल्या घरांपैकी ४३% घरे एक कोटी रु. पेक्षा जास्त किंमतीची होती. शिवाय, तिमाही विक्रीमध्ये या श्रेणीतील घरांचे प्रमाण ३८% आहे.
या अहवालात अहमदाबाद, बंगळूर, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, दिल्ली-एनसीआर (गुरुग्राम, नोयडा, ग्रेटर नोयडा, गाझियाबाद आणि फरीदाबाद), एमएमआर (मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे) आणि पुणे या निवासी बाजारपेठांचा समावेश करण्यात आला...
